महाविकास आघाडी म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे : देवेंद्र फडणवीस

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. यानंतर या मंत्रिमंडळात भाजपाचे जेष्ठ नेते नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील, भारती पाटील या नेत्यांना सामील करून घेण्यात आले. तसेच यानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांची महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा सुरु झालीय. या यात्रेत नवनिर्वाचित मंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. मात्र यावरून सत्ताधाऱ्यांनी भाजपावर टीकांचा भडीमार केलाय.

यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी केलेल्या टीकांना भाजपाने प्रत्युत्तर दिलाय. आज मुंबईत एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. आघाडी सरकार चुकून आलेले आहे. ज्याप्रकारे गुळाच्या ढेपेला मुंगळे चिपकतात, त्याप्रकारे आघाडीतील पक्ष व त्यातील नेते हे सत्तेला चिपकलेले आहेत. भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेवर शिवसेनेने जत्रा अशी टीका केली. या विधानावर फडणवीसांनी पलटवार केला आहे.

यावेळी जन जनआशीर्वाद यात्रा, महाविकास आघाडी सरकार युती, शेतकरी नुकसान भरपाईचे प्रश्न आदींवरून फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले. या सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच ज्यांना जत्रेचा अनुभव आहे, त्यांना दुसरे काय दिसणार, लोकांचा चांगला प्रतिसाद दिसतोय, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा