‘सरकार आमचंच येणार’; सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

आमचा फॉर्म्युला ठरला आहे. जी नाराजी आहे. ती दूर होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला जनादेश दिला आहे. गोड बातमी कधीही येऊ शकते, त्यामुळे सरकार आमचंच येणार’, अशी प्रतिक्रिया देत सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिनिधी म्हणून 7 नोव्हेंबरला चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार राज्यपालांची भेट घेणार आहेत. अवकाळी पावसाच्या नुकसानाचा आढावा घेण्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी समोरासमोर बसून चर्चा केली. या बैठकीनंतर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. भाजपनं चर्चेसाठी दिलेल्या आमंत्रणावर शिवसेनेनं अजून सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. तरी नाराजी दूर करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास मुनगंटीवारांनी व्यक्त केला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.