राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हा मोठा खेळाडू करणार यजमान तेलंगणाचे नेतृत्व

हैद्राबाद । एम महेंदर रेड्डी हा ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत यजमान तेलंगणा राज्याच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. तर महिलांच्या संघाचे नेतृत्व के माहेश्वरीकडे देण्यात आले आहे.

वरिष्ठ गटाची ही राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप येत्या ३१ डिसेंबरपासून हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे होणार आहे.

या स्पर्धेत एकूण २९ राज्यांचे आणि सर्विसेस, रेल्वे आणि बीएसएनचे ३ असे ३१ संघ भाग घेणार आहे. यात भारतीय कबड्डी संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रो कबड्डीमधील स्टार कबड्डीपटू, जिल्हा आणि राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केलेले आणि संघात निवड झालेले १५०० खेळाडू भाग घेणार आहेत.

ह्या स्पर्धेचा उदघाटन समारंभ ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. स्पर्धेत पुरुष आणि महिलांचे संघ असणार आहेत. नॉकआऊट अर्थात बाद फेरीचे सामने नवीन वर्षात अर्थात ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी होणार आहेत. हे सामने प्रकाशझोतात आणि मॅटवर खेळवले जाणार आहेत.

बाद फेरीचे सामने स्टार स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सच्या अन्य चॅनेलवर चाहत्यांना पाहायला मिळू शकतात. विशेष म्हणजे ३ ते ५ डिसेंबर या काळातील पुरुष आणि महिलांचे सर्व सामने हे या चॅनेलवर दाखवले जाणार आहे.

तेलंगणाच्या पुरुषांचा कबड्डी संघ: एम महेंदर रेड्डी, गगांधारी मल्लेश, जी जीवा, एस भास्कर, सामा निरीक्षण रेड्डी, एसके अमीर, कुमारी शिवाईः, प्रद्वेष कुमार राठी , एस किशोर, मुनीश कुमार, कुमावत रवींद्र रमेश, भरत जाधव, ए गौरीशंकर, इ लक्ष्मीनारायण. प्रशिक्षक: एस वेंकटेश

तेलंगणाच्या महिलांचा कबड्डी संघ: के माहेश्वरी, आर अखिला, शेख नौशीन, के प्रियांका, मोहम्मद सना, बी प्रवल्लिका, व्ही मौनिका, आर कविथा, के मौनिका, पी सौन्दर्या, टी कावेरी रेड्डी, जी अदिलक्ष्मी, एम रेणुका, रत्ना कुमारी. प्रशिक्षक: सुधाकर राव

संपूर्ण वेळापत्रक: ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपचे संपूर्ण वेळापत्रक, महाराष्ट्रासाठी साखळी फेरीचे सामने सोपे !

आज ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपचे वेळापत्रक घोषित झाले. महाराष्ट्राला साखळी फेरीतुन बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी मोठे कष्ट करावे लागणार नाही असे दिसते.

महाराष्ट्र पुरुष संघाचे साखळी सामने: 
स्पर्धेत एकूण ८ ग्रुप असून पुरुषांचा संघ क गटात आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाला ३ सामने खेळावे लागणार आहे. महाराष्ट्राचा सलामीचा सामना १ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जम्मू आणि काश्मीर संघासोबत आहे तर दुसरा सामना २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता गुजरात संघासोबत आहे. त्याच दिवशी शेवटचा साखळी सामना महाराष्ट्र संघ पाँडिचेरीबरोबर संध्याकाळी ५ वाजता खेळेल.

महाराष्ट्र महिला संघाचे साखळी सामने: 
महिलांच्या स्पर्धेतही ८ ग्रुप असून साखळी फेरीतून १६ संघ पुढे जाणार आहेत. महाराष्ट्राच्या महिलांचा संघ ड गटात असून या गटात गुजरात, उत्तराखंड आणि ओडिशा हे अन्य संघ आहेत. महिलांचा साखळी फेरीतील पहिला सामना हा १ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता गुजरातबरोबर तर दुसरा सामना त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी उत्तराखंड संघासोबत आहे. साखळी फेरीतील अखेरचा सामना ओडिशा संघासोबत २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता आहे.

पुरुषांच्या बाद फेरीचे सामने- 
जे १६ संघ बाद फेरीत साखळी फेरीतून प्रवेश करणार आहे त्यातील पुरुषांचे संघ उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने ३ जानेवारीला, उपांत्यपूर्व फेरीचे सामने ४ जानेवारीला, उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने ५ जानेवारी रोजी खेळातील.

महिलांच्या बाद फेरीचे सामने- 
जे १६ संघ बाद फेरीत साखळी फेरीतून प्रवेश करणार आहे त्यातील महिलांचे संघ उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरीचे सामने ३ जानेवारीला तर उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने ५ जानेवारी रोजी खेळातील.

हे आहे संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक:

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.