InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

महेंद्रसिंह धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याच निर्णय संपूर्ण संघाचा- रवी शास्त्री

विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात महेंद्रसिंह धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याच निर्णय संपूर्ण संघाचाच होता, असे स्पष्टीकरण भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुखातीवेळी ते बोलत होते.

उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला. या सामन्यात ७ व्या क्रमांकावर मैदानात उतरलेल्ल्या महेंद्रसिंह धोनीने ५० धावा करून रविंद्र जडेजा (७७) सोबत ११६ धावांची भागीदारी केली. दोघांच्या आक्रमक खेळीने विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. जडेजा बाद झाल्यानंतर काही अंतराने मार्टीन गुप्टीलच्या अचूक फेकीवर धोनी धावचीत झाला. धोनी बाद झाल्यानंतर भारतीय संघ सामना जिंकण्याच्या सर्व आशा संपुष्टात आल्या.

सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांनी धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला का पाठवले असा सवाल उपस्थित करत या निर्यणयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. माजी खेळाडूंच्या या आरोपावर रवी शास्त्री यांनी मौन सोडले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीवेळी ते म्हणाले. ५ धावांवरच संघाचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. त्यामुळे संघ बिकट अवस्थेत होता.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply