InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाची तारीख ठरली

- Advertisement -

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कप स्पर्धेनंतर क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यानं वेस्ट इंडिज दौरा आणि मायदेशात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. पण, या सर्व अफवा असल्याचे धोनीची पत्नी साक्षीनं स्पष्ट केले होतेच.. आता सूत्रांच्या माहितीनुसार धोनीनं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याची तारीख ठरवली आहे.

- Advertisement -

Loading...

धोनीच्या अनुपस्थितीत आणि आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून भारतीय निवड समितीनं रिषभ पंतला प्राधान्य दिले. मात्र, पंतला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह निवड समितीनंही पंतला अखेरचा इशारा दिला आहे. निवड समितीनं आता पंतला पर्यायाची चाचपणी करण्याचा निर्धार घेतला आहे. अशा परिस्थितीत धोनीला पुन्हा बोलवा अशीची मागणी जोर धरू लागली आहे.

Related Posts

शरद पवार म्हणजे कसलेला गडी; हवेचा रोख बरोबर ओळखतात- नरेंद्र मोदी

”धोनीचं संघासाठीच्या योगदानाचा मुल्यमापन कुणीच करू शकत नाही. केवळ धावाच नव्हे, तर यष्टिंमागूनही त्यानं संघासाठी मोलाची कामगिरी केली आहे. संघात त्याचं असणे हे केवळ खेळाडूंच्याच नव्हे, तर कर्णधाराच्याही फायद्याचे असते. त्याचा अनुभव आणि नेतृत्वगुणाचा संघालाच फायदा मिळतो. पण, आता ती वेळ आली आहे,” असे गावस्कर यांनी पुढे स्पष्ट केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.