भावाच्या मृत्युनंतर माही विजने केली भावनिक पोस्ट शेअर; सोनू सूद आणि भारती सिंगचे मानले आभार

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री माही विज हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे माहीने तिच्या लहान भावाला गमावले. माहीने एक भावुक पोस्ट शेअर करत निधनाची माहिती दिली आहे. भाऊ रूग्णालयात असताना मदत केल्याबद्दल अभिनेता सोनू सूदचे तिने आभार देखील मानले आहेत.

माहीने पोस्टमध्ये लिहिले, ‘माझ्या भावाला रूग्णालयात बेड मिळवून देण्यासाठी आभारी आहे सोनू सर. मी खचले होते. अशात तुम्ही मला लढण्याचे बळ दिले, आशा दाखवली. माझा भाऊ बरा होऊन घरी परत येईल, अशी मला आशा होती. पण कदाचित तुम्हाला सत्य माहित होते. तुम्ही लोकांच्या मदत करत आहात. मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो लोकांना हिंमत आणि सकारात्मकता देण्यासाठीही मी तुमचे आभार मानते’.

आपल्या पोस्टमध्ये माहीने भारती सिंहचेही आभार मानले आहेत. ‘भारती, तू रोज माझ्या भावाची काळजीने चौकशी करायचीस. व्हिडीओद्वारे मला पॉझिटीव्ह राहण्याची हिंमत द्यायचीस, तुझेही आभार,’ असेही तिने लिहिले.

महत्वाच्या बातम्

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा