कर्जमुक्ती योजनेवर मोठा परिणाम; कर्जमाफीचा लाभ देणे तूर्तास शक्य नाही

एकीकडे कोरोनाचं संकट गडद होत असताना दुसरीकडे राज्याची अर्थव्यवस्था देखील कोरोनाच्या कचाट्यात सापडली आहे. साहजिकच कोरोनाचा परिणाम शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर परिणाम झाला आहे.

Corona Update : अहमदनगरमध्ये कोरोनाची आतापर्यंत 60 जणांना लागण

राज्याची आर्थिक स्थिती खालावलेली असताना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मधील उर्वरित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे तूर्तास शक्य नाही, असा महत्तपूर्ण निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. तसंच ज्या शेतकऱ्यांची खाती निरंक झाली नाहीत त्यांना नवीन पीक कर्ज मिळणार नाही, असंही शासनाने जाहीर केलं आहे.

Loading...

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेतकरी वर्ग अभूतपूर्व संकटात सापडला आहे. तसंच लॉकडाऊनमुळे सरकारचा महसूल देखील दोन महिने पूर्णपणे थांबला होता.याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. याचमुळे सरकारी तिजोरीत देखील खडखडाट जाणवू लागला आहे.

आगामी काळात कांद्याचे भाव गडगडणार ; अजित पवारांनी व्यक्त केली भीती

दरम्यान, सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसणार आहे. या निर्णयाने सरकारचे काही हजार कोटी रूपये वाचणार आहे. हेच पैसे सध्या कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च करण्यास उपयोगी येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.