InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘भारताची ओळख ‘मेक इन इंडिया’ होती पण आता रेप इन इंडियाच्या दिशेने वाटचाल’

देशात वाढणारे महिला अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांवरुन काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. लोकसभेत आज काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सरकारवर टीका करताना भाजपाने ज्या भारताची ओळख मेक इन इंडिया सांगितली होती तो भारत आता रेप इन इंडियाच्या दिशेने वाटचाल करतोय अशा कडक शब्दात भाष्य केलं.

मंगळवारी लोकसभेत काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक मुद्द्यावर बोलतात, मात्र महिलांच्या विरोधातील अत्याचाराबाबत मोदी गप्प बसले आहेत. भारत मेक इन इंडियापासून रेप इन इंडियाच्या दिशेने जातोय असं त्यांनी सांगितले. यापूर्वीही अधीर रंजन चौधरी यांनी महिला मुद्द्यावर भाष्य करताना लोकसभेत म्हटलं होतं की, एकीकडे देशात रामाचं मंदिर बनविले जातंय तर दुसरीकडे सीतामातेला जाळण्याचं काम होतंय. उन्नाव आणि हैदराबाद बलात्काराच्या घटनेवर त्यांनी महिला सुरक्षेचा मुद्दा लोकसभेत उचलला होता.

Loading...

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.