InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

योगपालन जीवनभर करावं- नरेंद्र मोदी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांची येथील प्रभात तारा मैदानात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

40 हजारपेक्षा अधिक लोक या मैदानात उपस्थित होते. तुमच्या दैनंदिन आयुष्यात योगसाधना अविभाज्य भाग झाला पाहिजे. योग हा सर्वांचा आहे. हवामान बदल हे यंदाच्या योग दिनाचे सूत्र आहे असं प्रतिपादन यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलं.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, समाजातील गरिबांपर्यंत योगा पोहचला तर ते आजारापासून वाचू शकतील.  आमचे सरकार योगाभ्यासाच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य कसे सुधारता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. योगाचं पालन संपूर्ण जीवनभर केलं पाहिजे. योग कधीही वय, रंग, जात-पात, धर्म-पंत, श्रीमंत-गरीब, प्रांत-देश असा भेदभाव करत नाही. योग सर्वांचा आहे आणि सर्व जण योगाचे आहेत असं मोदी म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.