भर रस्त्यात मलायका अरोरा गजरेवालीवर भडकली; व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री मागच्या काही काळापासून अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे बरीच चर्चेत आहे. अर्जुनच्या वाढदिवसाला मलायकानं त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत या नात्याची कबुली दिली. त्यानंतर कोणत्याही कार्यक्रमात किंवा मुलाखतीत हे दोघंही एकमेकांबद्दल उघडपणे बोलताना दिसतात. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणानं लाइम लाइटमध्ये राहणारी मलायका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

मलायका तिच्या जिममधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी गजरे विकणारी एक महिला तिला गजरा घेण्याची विनंती करते. त्यावेळी मलायका त्या महिलेला नाही म्हणून पुढे निघून जाते. पण ती महिला पुन्हा तिच्या मागे जाते. मलायका तिच्या कारमध्ये बसल्यावर ती गजरेवाली पुन्हा तिला गजरा घ्यायला सांगते. पण यावेळी ती गजरेवाली म्हणते, हा गजरा अरबाजकडून असं समजा. हे ऐकल्यावर मात्र मलायकाच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसला. पण तिनं काहीही बोलणं टाळलं आणि लगेच कारमध्ये बसून निघून गेली. ज्यात अरबाज खानचं नाव ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलताना दिसले. मलायकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मलायकाला या गजरेवालीचं बोलणं आणि विशेषतः अरबाजचं नाव घेणं फारसं आवडलेलं दिसलं नाही. तिच्या चेहऱ्यावरील नाराजी या व्हिडीओमध्ये लपत नाही.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.