नवाब मलिक आणि अनिल देशमुखांची याचिका न्यायालयाने फेटाळली, विधानपरिषदेत मतदान करण्याची परवानगी नाही

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. यासाठी २० जूनला मतदान होणार आहे. तसेच याआधी विशेष पीएमएलए न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सोडण्यास नकार दिला होता.

त्यामुळे 10 जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत त्यांना मतदान करता आले नाही. यानंतर आता या दोघांनी आता विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी 20 जून रोजी एक दिवसासाठी तुरुंगातून सोडण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी आज सुनावणी पार पडली.

याआधी विशेष पीएमएलए न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे विधानपरिषदसाठी मतदानाची परवानगी मिळवण्यासाठी मलिक आणि देशमुखांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांचा हा प्रयत्नही फसला आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांची विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्याची याचिका फेटाळून लावली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा