मलिकांनी घेतली मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट; मुंबई पोलीस दलात हालचालींना वेग

मुंबई : आर्यन खान प्रकरणानं गेल्या काही दिवसांपासून वेगळं वळण घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर धक्कादायक आरोप केले होते.

यानंतर अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा वाद आणखीनच वाढत चालला आहे. यानंतर समीर वानखेडे हे अंतर्गत चौकशीसाठी दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात दाखल झाले आहेत. या आरोपांसंदर्भातच मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आहे.

गृहमंत्री वळसे पाटील आणि मुख्यमंत्रांची मी भेट घेतली. त्यांच्यांशी मी एसआयटीच्या चौकशीबाबत चर्चा केली आहे. गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, या प्रकरणात बऱ्याच लोकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलीस विभाग त्याचा तपास करत आहे. तपास करून निश्चितपणे यामध्ये गुन्हा दाखल करून त्यावर कारवाई होईल, असंही मलिक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा