‘ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी’, फडणवीसांच्या सत्तापालटाच्या विधानाचा मलिकांनी घेतला समाचार

पंढरपूर : राज्यात सरकार स्थापन झाले तेव्हा या सरकारने महाविकास आघाडी सरकार असे नाव दिले होते. मात्र आता हे सरकार महावसुली सरकार झाले आहे. पोलिसांच्या भरवशावर खंडणी वसूल करणारे हे सरकार असल्याचे उघड झाले आहे. लोकशाहीमध्ये सरकारचा अनाचार, भ्रष्टाचार दाखवून द्यायचा असेल तर या जुलमी सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा हक्क तुम्हाला प्राप्त झाला आहे, या महावसुली सरकारला घालवण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे. त्या संधीला दवडू नका, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पंढरपुरात केले. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी फडणवीसांनी पंढरपुरात प्रचारसभा घेतली. विशेष म्हणजे शरद पवारांसारखेच देवेंद्र फडणवीसही पावसात बोलत असल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या.

‘लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलतंय का? अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो. पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे. या सरकारचा भ्रष्टाचार, जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे’, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. ‘गेले पंधरा महिने भाजप महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो, ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल,’ असं भाष्य नवाब मलिक यांनी केलं असून अशक्य असलेल्या गोष्टींसाठी वापरल्या जाणाऱ्या हिंदी वाकप्रचाराचा (ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी) वापर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा