मलिंगाने काहीही शिकवलं नाही ! – जसप्रीत बुमराह

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यात मुंबईच्या फलंदाजांची आणि गोलंदाजांची महत्त्वाची आहे. २०१९ च्या अंतिम सामन्यात तर मुंबईला शेवटच्या टप्प्यात जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा या दोघांनी तारलं.

दररोज फक्त 20 मिनिटे चालण्याचे काय आहेत फायदे ?

त्या दोघांच्या गोलंदाजीमुळे मुंबईला चौथ्यांदा विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली. पण सध्या हे दोन गोलंदाज एका वेगळ्या विषयामुळे चर्चेत आले आहेत. भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने लसिथ मलिंगाबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.

”अनेकांना वाटतं की लसिथ मलिंगाने मला यॉर्कर चेंडू कसा टाकायचा? ते शिकवलं. पण ते चुकीचं आहे. त्याने मला मैदानावरील कोणत्याही गोष्टी शिकवल्या नाहीत. मी त्याच्याकडून काही शिकलो असेल तर ते म्हणजे विचार करण्याची पद्धत…”

दिंडोरी तालुक्यात महिलांना घरगुती गॅसचं वाटप

”वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये गोलंदाजाने स्वत:ला कशाप्रकारे विचार करावा, गोष्टी मनासारख्या घडत नसतील तरी गोलंदाजाने रागवायचे नाही, ठराविक फलंदाजासाठी ‘प्लॅन’ कसा आखावा, अशा काही गोष्टी मी त्याच्याकडून समजून घेतले आणि शिकलो”, असे बुमराहने मुलाखती दरम्यान सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.