Mallikarjun Kharge | “काँग्रेसने 70 वर्षात लोकशाही वाचवली आणि तुम्हाला पंतप्रधान केलं” : मल्लिकार्जुन खरगे

Karnataka Election 2023 | कर्नाटक : आगामी 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे पक्ष आपापल्या पातळीवर तयारी करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर फक्त दोनच आठवड्यावर कर्नाटकची
विधानसभा निवडणुकच येऊन टेकली आहे. यासाठी कर्नाटकमध्ये भाजप विरोध काँग्रेस अशी लढत होणार असून सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. कर्नाटक राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने आणि विरोधी पक्ष काँग्रेस ने आपली पूर्ण ताकत या निवडणुकीसाठी लावली असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर आता इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटक निवडणुकीवर भाष्य करत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसने 70 वर्षात लोकशाही वाचवली : मल्लिकार्जुन खरगे ( Congress saved democracy in 70 years: Mallikarjun Kharge)

मुलाखती दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावेळी त्यांनी असं वक्तव्य केलं की, “काँग्रेसने 70 वर्षात लोकशाही वाचवली आणि तुम्हाला पंतप्रधान केलं”. त्याच्या या वक्त्याव्यामुळे चर्चा रंगू लागल्या आहेत तसचं पुढे बोलताना खरगे म्हणाले की, कर्नाटकची ही निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी या मुद्द्यावर लढली जाणार नाही तर राज्याच्या मुद्द्यांवर लढली जाणार आहे. पुढे ते म्हणाले की आज जेव्हा कोणत्याही ठिकाणी एखादी ट्रेन सुरु होते तेव्हा पंतप्रधान तिला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी जातात. खरगेंनी भाजपवर काँग्रेसच्या योजनांचे नामांतर करुन उद्घाटन केल्याचा आरोप केला आहे. तसंच अशा छोट्या गोष्टींवर दावा करु नका, असंही त्यांनी सांगितलं. जर दावा करायचा असेल तर आधी मोठ्या गोष्टी करा, जशा पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पंचवार्षिक योजना होत्या. अशी उदाहरणे देखील त्यांनी मोदींना टोला लगावत दिली आहेत. तर तुम्ही काही सार्वजनिक क्षेत्र विकून खात आहात आणि आम्हाला विचारता का की,काँग्रेस ने 70 वर्षात काय केलं? मग उत्तरं असं आहे आम्ही 70 वर्षात लोकशाही वाचवली आणि तुम्हाला पंतप्रधान केलं. अशा शब्दात मोदींनीवर खरगेनि निशाणा साधला आहे.

दरम्यान, खरगे यांना विश्वासाने सांगितलं की,या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत नक्कीच मिळेल. आम्ही आमच ठरवलेलं लक्ष नक्कीच साधू. उत्तर कामगिरी करून ही लढाई जिंकू. आमचेही आमदार भाजपकडून फोडले जातात परंतु त्यांनी त्याचं काम करावं. आमच्यासाठी फक्त करोची लढाई आणि मरोची लढाई नाही.असं ही खरगे म्हणाले. तर गेल्या काही दिवसांपूर्वी खरगे आणि राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी घेतली असल्याचं सांगण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्या-