Mallikarjun Kharge । काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवड ; शशी थरूर यांचा पराभव

(Mallikarjun Kharge) Maharashtra Desha : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत. या निवडणुकीमुळे काँग्रेसला दोन दशकांहून अधिक काळानंतर प्रथमच गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. शशी थरूर यांना 1072 मत मिळाली आहेत. तर मल्लिकार्जुन खर्गे यांना 7898 मत मिळाली आहेत.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात झाली. परवा (17 ऑक्टोबर) या निवडणुकीसाठीचं मतदान झालं होतं. त्यानंतर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. सध्या सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. 2001 साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या होत्या.

या निवडणुकीत 96 टक्के मतदान झालं. या निवडणुकीत काँग्रेस प्रदेश समित्यांच्या 9,900 प्रतिनिधींपैकी 9,500 प्रतिनिधींनी मतदान केले. अनेक छोट्या राज्यांत 100 टक्के, तर मोठ्या राज्यांत जवळपास 90 टक्के मतदान झाले होते. देशभरातील 40 केंद्रांवर 68 बूथ स्थापन करण्यात आले होते. राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडली.

राहुल गांधी यांनी आज दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा पक्ष निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याच्या अर्धा तास आधी काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून उल्लेख केला आणि श्री खरगे यांना अधिकृतपणे विजयी घोषित केले. आज आंध्र प्रदेशात पक्षाच्या ‘भारत जोडो यात्रे’चे नेतृत्व करणारे राहुल गांधी मतमोजणी सुरू असताना दुपारी 1.30 वाजण्यापूर्वी पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेस पक्षनेते 2019 पासून ज्याची वाट पाहात होते, ते अध्यक्ष आज पक्षाला मिळाले आहेत. राहुल गांधी यांनी 2019 मध्ये काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम बघत होत्या मात्र पक्षाची देशभरातील एकंदरीत स्थिती पाहता पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी पक्षाला अध्यक्ष असणं गरजेचं होत. आखेल आज तो दिवस आला आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची अध्यक्षपदी निवड झाली.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.