ममता बॅनर्जी अ‍ॅक्शन मोडमध्ये; दर दोन महिन्याला दीदींची दिल्ली वारी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्ली दौऱ्यावर असून आज कोलकाता परतणार. त्या दिल्लीत अनेक नेत्यांना भेटल्या. त्यांनी आज एक नवा नारा दिल्याचे समोर आले आहे. त्या म्हणाल्या की, लोकशाही पुढे गेली पाहिजे. ‘लोकशाही वाचवा, देश वाचवा’ हा आमचा नारा आहे.

ममता बॅनर्जी शरद पवारांची भेट घेणार होत्या. मात्र, काही अडचणीमुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्नशील असलेल्या ममता बॅनर्जी पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होत्या. त्यांच्या दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.

यावेळी त्या म्हणाल्या की, मी शरद पवारांशी बोलले. हा दौरा यशस्वी झाला आहे. पुढच्यावेळी त्यांची भेट घेईल. आम्ही राजकीय हेतूसाठी भेटलो होतो. लोकशाही पुढे गेली पाहिजे. आमचा नारा ‘लोकशाही वाचवा, देश वाचवा’. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पाठिंबा देतो. आता मी दर दोन महिन्याला दिल्लीत येईल. असं बॅनर्जी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा