“ममता बॅनर्जी मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय, अनेक राज्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास तयार”

नवी दिल्ली : २०२१ च्या पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर यश संपादन करत राज्यात सरकार स्थापन केल. ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून प्रबळ दावेदार आहेत. त्याच बरोबर संपूर्ण देशात आता ममता बॅनर्जींची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. एक प्रबळ विरोधी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे.

अशातच टीएमसी खासदार आणि पार्टीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. केवळ बंगालच नाही तर इतर राज्येही येत्या काळात विजयाची नोंद करतील. सध्या टीएमसी हा एकमेव पक्ष आहे, जो बाहेरील लोकांसमोर न झुकता संपूर्ण ताकदीने लढाई लढत आहे. आम्ही त्रिपुरा आणि आसामला पोहोचलो आहोत आणि आता आम्ही गोव्यालाही जाऊ. ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत, असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

दरम्यान, आता याआधी विधानसभा निवडणुकीत ममताजींचा पराभव झाला होता. यानंतर आता पुन्हा एकदा ममता बॅनर्जी भवानीपूरमधून पोटनिवडणूक लढवत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी या निवडणुकीत यश संपादन करणं त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिषेक बॅनर्जी जग्गू बाजारातील प्रचार सभेला संबोधित करत होते.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा