InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

ममता बॅनर्जी यांना झटका; राजीव कुमार यांना सीबीआयसमोर हजर करा; न्यायालयाचे आदेश

- Advertisement -

शारदा चिटफंड घोटाळ्या प्रकरणी मोदी सरकार विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला. कोलकाता शहर पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआय समोर हजर होण्यात काय अडचण आहे असा सवाल करत न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना झटका दिला आहे.

- Advertisement -

Loading...

अॅटर्नी जनरल के.के.वेणुगोपाल यांनी डीजीपी, मुख्य सचिव आणि राजीव कुमार यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. यावर सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी राजीव कुमार यांनी असहकार्य करण्याचे काहीच कारण नसल्याचे सांगितले. त्यांनी कुमार यांना सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले. त्यावर पश्चिम बंगाल सरकारची बाजू मांडणाऱ्या अभिषेख मनु सिंघवी यांनी सीबीआयला कुमार यांना अटक करायची असल्याचे कोर्टात सांगितले. यावर न्या.गोगोई यांनी कुमार यांना अटक करता येणार नाही असे स्पष्ट केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.