InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

ममता बॅनर्जी म्हणतात, मी मोदींना मिठाई पाठवली असेल; पण…..

अभिनेता अक्षय कुमारने काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींनी अनेक प्रश्नांना मोकळेपणाने उत्तर दिले. या मुलाखतीमध्ये मोदी म्हणाले की, ममता बॅनर्जी या मला दरवर्षी न चुकता मला कुर्ता आणि मिठाई पाठवतात. मोदींच्या या विधानावर आता ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिले आहे.

ममता बॅनर्जी म्हणाले की, मी अनेक प्रसंगी अनेकांना मिठाई पाठवली असेल पण त्यांना मत देणार नाही. मी लोकांना रसगुल्ला पाठवते, पुजेदरम्यान उपहार पाठवते आणि चहा पाजते पण मी त्यांना एकही मत देत नाही. असे उत्तर ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. हुगली जिल्ह्यातील एका प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.