InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

ईव्हीएमवर एकाला मत, व्हीव्हीपॅटवर दुसऱ्याच व्यक्तीचं नाव; दिल्लीतील खळबळजनक प्रकार

ईव्हीएमवर एकाला मत दिल्यानंतर व्हीव्हीपॅटवर दुसऱ्याच व्यक्तीचं नाव झळकल्याचा प्रकार दिल्लीत घडला. या प्रकरणाची तक्रार न करण्याचा सल्ला मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी दिला. तक्रार केल्यास तुरुंगवास घडेल, असा ‘धोक्याचा इशारा’देखील अधिकाऱ्यांकडून देण्यात आला. पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातल्या मटियाला मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. याची चौकशी करण्याचे आदेश मुख्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत.

ईव्हीएमवर एकाला मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅटवर दुसऱ्याच व्यक्तीचं नाव दिसल्यानं मिलन गुप्ता यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र त्यांनी याबद्दल कोणतीही तक्रार न करण्याचा सल्ला दिल्याचं गुप्ता यांनी ट्विटमध्ये म्हटले.

‘ईव्हीएमवर लाल दिवा पेटला, पण व्हीव्हीपॅटवर वेगळ्याच व्यक्तीचं नाव दिसले. मी या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी मला नोडल अधिकाऱ्याकडे जाण्यास सांगितलं. त्यांनी मला सेक्शन अधिकाऱ्यांकडे जाण्याचा सल्ला दिला. या सगळ्यांनी मला तक्रार करू नका असे सांगितले,’ असे गुप्ता यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply