मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या; औरंगाबादमधील घटना
- Advertisement -
औरंगाबाद : राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात मराठी समाजाच्या वतीनं ठीक -ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी अनेकांनी आत्महत्या देखील केल्यात, दरम्यान आज आणखी एकाने आत्महत्या केलीये. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विजयनगर येथील कारभारी शेळके (४३) यांनी शुक्रवारी (10 ऑगस्ट) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
शेळके यांनी घरातील लोखंडी अँगलला गळफास घेत आत्महत्या केली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शेळके यांनी आत्महत्येआधी एक चिठ्ठी लिहीली होती. यामध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Loading...
Related Posts
शेळके यांच्यावर श्रीराम फायनान्सचे २ लाखांचे कर्ज होते. या चिठ्ठीमध्ये मराठा आरक्षण आणि श्रीराम फायनान्सकडून कर्ज वसुलीसाठी होत असलेल्या दबावामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. तसेच माझ्या मरणानंतर माझ्या मुलांना आरक्षण द्या अशी मागणी शेळकेंनी चिठ्ठीत केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरुवारी बंद पुकारण्यात आला होता. त्यानंतर आज ही घटना घडल्याने विजयनगर येथे मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.
- Advertisement -
Loading...
मराठा आरक्षण : आंदोलनाचे नेतृत्व खा. उदयनराजेंना बरोबर घेऊनच करणार – खा.संभाजीराजे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.