InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

रोड शो दरम्यान अरविंद केजरीवाल यांना तरूणाने कानशिलात लगावली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर रोड शो दरम्यान एका तरूणाने कानशिलात लगावण्याची घटना घडली आहे. अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मोतीनगरमध्ये आपचे उमेदवार बृजेश गोयल यांच्या प्रचारासाठी आले होते.त्याचवेळी अचानक एक युवक त्यांच्या जीपच्या बोनटवर चढला आणि कानाखाली मारले.

हल्ल्यानंतर तरूणाला आपच्या कार्यकर्त्यांनी तरूणाला बेदम चोपत, पोलिसांच्या हवाली केले. केजरीवालांवर हल्ला करणाऱ्याचे नाव सुरेश असून तो कैलास पार्क येथील रहिवासी आहे. यापूर्वी 2014 मध्ये सुद्धा एका युवकाने अरविंद केजरीवाल यांच्या वाहनावर चढून कानशिलात लावली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.