इंदू मिलच्या पायाभरणीवरून मानापमान नाट्य सुरु ; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला

राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन टांगाचे सरकार आहे. पण माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चांगले संबंध आहेत. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत माझे संबंध कसे आहेत हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाचे निमंत्रण मला अद्याप मिळालेले नाही. याचाच अर्थ यात कोणी काटा घातला असेल हे तुम्ही चांगल्याप्रकारे समजू शकता, अशा शब्दांत वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना जोरदार टोला लगावला आहे.

मुंबई येथील इंदू मिलवरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमाला केवळ १६ जणांनाच आमंत्रण दिले गेले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि अधिकारी हे उपस्थित राहणार आहे. मात्र, या पायाभरणी कार्यक्रमाच्या आमंत्रणावरून त्यावरून राजकीय वर्तुळात चांगलेच मानापमान नाट्य सुरु झाले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.