Mandira Bedi | ‘या’ शोच्या माध्यमातून IPL मध्ये मंदिरा बेदीचे पुनरागमन

Mandira Bedi | मुंबई: सर्वात पहिले क्रिकेटच्या मैदानाला ग्लॅमरस लुक देणारी अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) परतणार आहे. एका नव्या शोच्या माध्यमातून मंदिरा बेदी क्रिकेट विश्वात पुनरागमन करत आहे. आयपीएल संघ राजस्थान रॉयल्स आणि कलर्स वाहिनीने मिळून ‘क्रिकेट का तिकीट’ हा नवीन क्रिकेट रियालिटी शो लाँच करणार आहे. हा शो अभिनेत्री मंदिरा बेदी होस्ट करणार आहे. या शोच्या माध्यमातून क्रिकेटपटूंना एक नवीन व्यासपीठ मिळणार आहे.

क्रिकेट प्रजेंडरचा ट्रेंड सुरू करणाऱ्या यादीमध्ये मंदिरा बेदी हिचे नाव सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे. मंदिरा बेदीने क्रिकेट प्रेझेंटर्सला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. ती क्रिकेट विश्वात नवीन शोच्या माध्यमातून पुनरागमन करणार आहे. या शोमध्ये देशातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना दाद दिली जाणार आहे. आठ भागांमध्ये हा शो प्रसारित केला जाणार आहे.

क्रिकहिरोज ॲपच्या माध्यमातून 15 जानेवारी 2023 पर्यंत या शोमध्ये इच्छुक प्रवेश मिळवू शकतात. या शोच्या महिला आणि पुरुष विजेत्याला पाच लाख रुपये मिळणार आहे. त्याचबरोबर हा शो जिंकणाऱ्याला एक वर्षासाठी राजस्थान रॉयल्सच्या कोचिंग स्टाफ आणि खेळाडूंकडून मार्गदर्शन मिळणार आहे.

अभिनेत्री मंदिरा बेदी हिने टीम इंडियाचे अनेक सामने होस्ट केलेले आहेत. त्याचबरोबर तिने इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सीझन होस्ट करून देखील चाहत्यांची मनं जिंकली आहे. आता पुन्हा एकदा मंदिरा बेदी चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सुसज्ज आहे. ती या शोच्या माध्यमातून आयपीएलमध्ये पुन्हा एकदा चमकणार आहे.

महत्वाच्या बातम्या