InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

माणिकराव शिंदे यांनी येवल्यातून मागितली राष्ट्रवादीकडे उमेदवारी

येवला मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मतदारसंघात आपल्याच समर्थकांकडून आव्हान मिळू लागलं आहे. भुजबळांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे माणिकराव शिंदे यांनी येवल्यातून राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी 4 महिन्याचा कालावधी असताना येवल्यात आतापासूनच निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे. छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक मानले जाणारे माणिकराव शिंदे यांनी यंदा उमेदवारीवर दावा ठोकून खळबळ उडवून दिली आहे. तिकडे वैजापूरचे कार्यकर्ते उमेदवारी करण्यास भुजबळांच्या उमेदवारीची मागणी करत आहेत.

या घडामोडींनंतर अखेर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणी कुठून उमेदवारी करायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. त्यामुळे पक्षाचा जो आदेश येईल त्यानुसार मी निवडणूक लढेन, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply