InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोदी सरकार के ‘दाल में कुछ काला’ है..

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राफेल करारावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राफेल कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशीची मागणी आम्ही केली. पण सरकार यासाठी तयार नाही. यावरुनच ‘दाल में कुछ काला’ असल्याचे लक्षात येते असा टोला त्यांनी लगावला.

त्याचबरोबर यूपीए सरकारवर करण्यात आलेल्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले. माझे सरकार कोणत्याही रिमोट कंट्रोलवर चालत नव्हते. मी पंतप्रधानपदी असताना सरकार आणि काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply