‘वाजपेयी खालच्या पातळीचा माणूस आहे’ म्हणणाऱ्या सुनील पालला मनोज वाजपेयीचं सडेतोड उत्तर

मुंबई : काही दिवसांपूर्वी कॉमेडियन सुनील पालने राज कुंद्रा प्रकरणी आपले मत व्यक्त केले होते. त्यामध्ये सुनीलने अभिनेता मनोज वाजपेयीला ‘गिरा हुआ इंसान’ असं म्हटलं होत. एवढंच नाहीतर मनोज वाजपेयीची अलीकडे प्रदर्शित झालेली वेबसीरिज ‘द फॅमिली मॅन २’ची तुलना पोर्नसोबत केली होती. आता सुनील पालच्या या वक्तव्यावर मनोज वाजपेयीने सडेतोड उत्तर दिले आहे.

राज कुंद्रा प्रकरणाबाबत माध्यमांसोबत बोलताना सुनील पाल म्हणाला होता की, ‘’जे झाले, ते होणारच होते. राज कुंद्राला अटक होणे गरजेचे होते. मी असं यामुळे म्हणतोय की, कारण मोठी लोकं याचा फायदा उचलत आहेत. यामध्ये अभिनेता मनोज वाजपेयी देखील आहे. त्याच्या सारखा खालच्या पातळीचा आणि बदमाश माणूस मी पाहिला नाही. आता इंडस्ट्रीमध्ये फक्त हेच राहिले आहे. एक मोठा अभिनेता असून मनोज वाजपेयी पण अशाप्रकारे शो करत आहे, ज्यामध्ये अश्लील दाखवले जात आहे.’’ अस सुनिलने वक्तव्य केले होते.

सुनील पालने केलेल्या या वक्तव्यावर मनोज वाजपेयीने इन-डायरेक्ट उत्तर दिले आहे. एका मुलाखतीत मनोज वाजपेयी म्हणाले की, ‘’लोकांकडे काम नाही आहे, हे मी समजू शकतो. मी स्वतः या परिस्थितीतून आलो आहे, परंतु या परिस्थितीत आल्यानंतर लोकांनी मेडीटेशन केले पाहिजे.’ असं म्हणत मनोज वाजपेयीने सुनील पालला सुनावले आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा