InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मान्सूनची प्रतीक्षा संपली, 6 जूनला मान्सून केरळात दाखल?

- Advertisement -

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह आता जोर धरू लागला असून, सोमवारी मान्सूनने मालदीव, कोमोरीनसह दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश केला. मान्सूनच्या पुढील प्रगतीस हवामान अनुकूल असून, सहा जून रोजी मान्सून केरळमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अंदमान निकोबार बेटं, अंदमानातील समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. यंदाचा मान्सून हा उशिरा दाखल होणार अशी माहिती स्कायमेटकडून वर्तवण्यात आली होती. तर अंदमानमध्ये 18-19 मेपर्यंत मान्सून धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.

- Advertisement -

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे 30 मेपर्यंत मान्सून दाखल होतो. पण यावेळी मान्सून काही दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने देशात यंदा चांगला मान्सून होणार असल्याचं म्हटलं आहे. मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव कमी असू शकतो असंही सांगण्यात आलं होतं.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, यंदा अल नीनो वादळाचा प्रभाव कमी असणार आहे. जर त्याचा प्रभाव असाच कमी राहिला तर शेतकऱ्यांसाठी यंदाचा मान्सून आनंदाचा आहे.

कांदा निर्यातीला आता दुप्पट सबसिडी; मोदी सरकारचा निर्णय

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.