InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

लोकसभा निकालानंतर भाजपचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येणार; ‘या’ काँग्रेस नेत्याचा दावा

कर्नाटक सुरु असलेल्या सत्तेच्या राजकारणामध्ये काँग्रेस नेत्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बीएस येडियुरप्पा यांनी 23 मेनंतर कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकारमध्ये अस्थिरता निर्माण होईल असा इशारा दिला होता. त्यावर सोमवारी काँग्रेसचे महासचिव के. सी वेणुगोपाळ यांनी उत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक भाजपाचे आमदार काँग्रेसमध्ये सहभागी होतील असा दावा वेणुगोपाळ यांनी केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास आहे. देशातील जनतेला परिवर्तन हवं आहे त्यामुळे 23 मेच्या निकालामध्ये सरकार बदलेलं दिसेल असं ते म्हणाले. मग 23 मेनंतर कर्नाटकात सरकार कसं अस्थिर होणार असा प्रश्न वेणुगोपाळ यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply