InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते माझ्या संपर्कात- राधाकृष्ण विखे पाटील

- Advertisement -

राज्याचे नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक दावा केला आहे. तो म्हणजे, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते त्यांच्या संपर्कात आहेत. ते भाजप-शिवसेना युतीत प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहेत. या बाबत लवकरच भाजपाध्यक्ष निर्णय घेतील, असेही विखे पाटलांनी सांगितले आहे. आषाढी एकादशीनिमित्त विखे पाटील सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेते नाराज आहेत. एकूण ते माझ्यासारखेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे. त्यामुळे मी स्वतः भाजपमध्ये आलो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आणखी कोणी युतीत प्रवेश केला तर त्यात आश्चर्य वाटायला नकाे.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.