‘कोरोनाकाळात ऑक्सिजनअभावी देशात अनेकांचा मृत्यू’ ; गडकरींचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासला होता. ऑक्सिजनसाठी राज्यांकडून केंद्राकडे सतत मागणी केली जात होती. दरम्यान, या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी कोणाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनात दिली. त्यानंतर केंद्र सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व्हायरल व्हिडिओमध्ये देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूबद्दल बोलताना दिसतात. ऑक्सिजन प्लांटच्या पायाभरणीच्या समारंभात 9 जून रोजी गडकरी बोलत होते.

त्यात ते म्हणतात की, कोरोना काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचा जीव गेला आहे.’ दरम्यान गडकरी यांना भाजपच्या पहिल्या फळीतील मंत्री मानले जाते. त्यामुळे त्यांचेच हे वक्तव्य आता भाजपची चांगलीच कोंडी करेल असे चित्र दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा