InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

एएन-32 मालवाहू विमान शोधात अनेक अडथळे

- Advertisement -

 

भारतीय वायू सेनेचं मालवाहू विमान एएन-32 हे मागील सोमवारपासून (3 जून) बेपत्ता झालं आहे. या विमानात एकूण 13 लोक होते. या विमानाने आसामच्या जोरहाट येथून अरुणाचल प्रदेशसाठी उड्डाण केलं होतं. त्यानंतर काही वेळेतच या विमानाशी संपर्क तुटला. वायू सेना या विमानाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

भारतीय वायू सेनेचं बेपत्ता मालवाहू विमान एएन-32 बाबत माहिती देणाऱ्याला 5 लाख रुपयांचं बक्षीस देण्याचं जाहीर करण्यात आलं. एअर ईस्टर्न एअर कमांडचे मार्शल आर. डी. माथुर यांनी याबाबत घोषणा केली आहे. विमानाबाबत माहिती कळवण्यासाठी चार संपर्क क्रमांकही देण्यात आले आहेत. यात 0378- 3222164, 9436499477, 9402077267, 9402132477 या क्रमांकांचा यात समावेश आहे.

- Advertisement -

वायू सेनेचे हेलिकॉप्टर, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, यूएव्ही, सेन्सर्स आणि नौदलातील P8I एअरक्राफ्ट हे सर्वच या विमानाचा शोध घेत आहेत. त्याशिवाय सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं, रडार, ऑप्टिकल, सेन्सर्स आणि सॅटेलाईटचीही मदत घेतली जात आहे.

वातावरण उड्डाणाला अनुकूल नसल्याने शोधकार्यात अडचण येत असल्याचं विमानाच्या शोधकार्यात असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. घटनास्थळावरुन संकेत पाठवणाऱ्या ‘Sabre-8’ इमरजन्सी लोकेटर ट्रान्समीटर्स (ELT) बेकॉनमध्ये आता केवळ 36 तासापर्यंत सक्रिय राहाण्याची बॅटरी आहे, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हा विमान क्रॅश झाला असेल, तर त्याच्या संभाव्य जागेहून इन्फ्रारेड आणि लोकेटर ट्रान्समीटरमधून मिळणाऱ्या संकेतांना पकडण्याचा प्रयत्न विशेष करत आहेत. फोटो आणि टेक्निकल सिग्नलच्या आधारे काही खास बिंदुंवर कमी उंचीवर हेलिकॉप्टर तपास करत आहेत. मात्र, इतक्या प्रयत्नांनंतरही अज्ञाप या विमानाबाबत कुठलीही माहिती मिळालेली नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.