InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

गडचिरोलीत माओवादी आणि पोलिसांमध्ये चकमक; मोठा शस्त्रसाठा जप्त

कुंडूमच्या जंगलात गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा ट्रेनिंग कॅम्प उध्वस्त केला. यावेळी पोलीस आणि माओवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. यात काही माओवादी ठार झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली. हे माओवादी घातपाती हल्ल्याच्या तयारीत होते. याची माहिती पोलिसांच्या विशेष दलाला मिळाली होती त्यानंतर विशेष ऑपरेशन राबवत पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी घनदाट जंगलात असलेल्या कॅम्पमधून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा, स्फोटकं आणि प्राचाराचं साहित्य जप्त केलं. या भागात पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली आहे.

पुण्यातून 9 वर्षांपुर्वी  बेपत्ता झालेला तरुण छत्तीसगडमध्ये माओवादी संघटनेत सहभागी झाला. तो आता माओवादी कमांडर झाला असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. छत्तीसगड पोलिसांनी नुकतीच माओवाद्यांची एक यादी जाहीर केली त्यात हे धक्कादायक वास्तव उघड झालं.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply