InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलावर हल्ल्याचा माओवाद्यांचा प्रयत्न

छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात अरनपूर ते निलवायाच्या रस्त्यावर सुरक्षा दलाच्या ताफ्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न माओवाद्यांनी केला. यावेळी माओवाद्यांनी भुसुरूंग स्फोटाद्वारे दोन ठिकाणी IED बॉम्ब पेरून ठेवले होते. पण, सीआरपीएफच्या जवानांनी त्या मार्गावरून जाण्यापूर्वी IED बॉम्ब निष्क्रिय केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

यापूर्वी देखील माओवाद्यांनी अशाच प्रकार जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केले होते. त्यामध्ये 15 जवान शहीद झाले होते. पण, आता CRPFच्या जवानांच्या सतर्कतेमुळे मात्र माओवाद्यांचा मोठा कट उधळला गेला.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.