‘उद्धव ठाकरे मुर्दाबाद’ अश्या घोषणा देणाऱ्या मराठा आंदोलकाला बेदम मारहाण

मराठा समाजाकडून काल आरक्षणाच्या मागणीसाठी ‘’ची घोषणा करण्यात आली होती. त्याच निमित्ताने औरंगाबादच्या क्रांती चौकात ठिय्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांनी मुर्दाबाद अश्या घोषणा दिल्या होत्या त्यामुळे आंदोलक आणि शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्यात धक्काबुकी झाली होती.
त्यानंतर दानवे यांनी ‘ तुम्हाला पाहून घेतो’ अशी धमकी आंदोलकांना दिली होती. त्यानंतर अज्ञात लोकांनी घोषणा देणाऱ्या एका तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली. ‘ तू येथून निघून जा नाहीतर जीवाला मुकशील, तू कोणाशी पंगा घेतला आहे तुला माहित नाही. चल निघ येथून ‘ असे धमकावले. आंदोलक तरुण जिवाच्या धास्तीने घरी निघाला. घरी जात असताना अज्ञात गुंडानी त्याला रस्तात अडवून, एका वाहनात बळजबरीने बसवून त्याला अज्ञात स्थळी नेउन लाथा-बुक्कांनी बेदम मारहाण केल्याचं वृत्त औरंगाबाद येथील स्थानिक दैनिकाने प्रकाशित केले आहे.

महत्वाच्या बातम्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.