InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

औरंगाबाद तोडफोड प्रकरणी सीआईडी चौकशी करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

औरंगाबाद :  गुरुवारी मराठा आरक्षणाकरिता पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद काही ठिकाणी शांततेत पाळण्यात आला, तर काही ठिकाणी या बंदला गालबोट लागलं. पुणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या बंद दरम्यान आंदोलकांनी औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक परिसरातील कार्यालयांचं आणि मालमत्तेचं प्रचंड नुकसान केले होतं.

या पार्श्वभूमीवर संतप्त उद्योजकांकडून औरंगाबादमध्ये पत्रकारपरिषद घेत, मराठवाडयात उदयोगधंदे आणावेत की नाही? असा सवाल करण्यात आला. तसेच आंदोलकांनी कंपन्यांच्या मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत, लूटही केल्याचा आरोप उद्यजकांकडून करण्यात आला होता.

Loading...

दरम्यान उद्योजकांच्या पत्रकार परिषदेनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देखील पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेमध्ये उद्योजकांनी केलेले आरोप फेटाळलण्यात आले. कंपन्यांची तोडफोड ही मराठा आंदोलकांकडून नाही तर, या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या बाहेरच्या लोकांकडून करण्यात आल्याचं मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाकडून स्पष्ट करण्यात आलं.

आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु होतं. कुठल्याही प्रकारची तोडफोड करण्याचा आमचा उद्देश नव्हता. कंपन्यांची तोडफोड बाहेरच्या व्यक्तींकडून करण्यात आली आहे. या प्रकरणाची सीआईडी चौकशी व्हावी अशी मागणी या पत्रकारपरिषदेमध्ये करण्यात आली आहे.

- Advertisement -

‘महाराष्ट्र बंद’ : पुण्यात हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तणाव

Loading...
You might also like
Loading...

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.