InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

…तर 27 ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

- Advertisement -

महाराष्ट्र बंदनंतर राज्यभरात मराठा समाजाच्या तरूणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील गुन्हे खोटे असल्याचा आरोप करत, हे गुन्हे मागे घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. गुन्हे मागे न घेतल्यास २७ ऑक्टोक्टोबरला मंत्रालयाला दुचाकी आणि चारचाकींचा घेराव घालण्याचा इशारा संघटनेच्या समन्वयकांनी दिला आहे.

- Advertisement -

गुन्ह्यांमुळे एका पिढीचे आयुष्य वाया जाण्याची भीती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी वाटतेय. डॉक्टर, वकील आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरूणांवर दाखल झालेल्या गुन्हे रद्द झाले नाही, तर भविष्यात आंदोलनात हेच तरूण हिंसेचा मार्ग स्वीकारतील. आरक्षण न देणाऱ्या सरकारने किमान तरूणांना गुन्हेगार होण्यास भाग पाडू नये, असे आवाहन संघटनेने केले आहे.

बंद दरम्यान कोणताही हिंसाचार केलेला नसतानाही सुशिक्षित तरूणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. आत्तापर्यंत अशा प्रकारचे साडेतीन हजार गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार संबंधित गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अन्यथा २७ ऑक्टोबरला हजारो दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या माध्यमातून मंत्रालयाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा समन्वयकांनी दिला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.