InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Maratha Kranti Morcha

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या महापुजेला विरोध करणारा 2 महिन्यानंतरही तरुंगात

मराठा आरक्षणासाठी 'मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात आषाढी एकादशीला पूजा करु देणार नाही' असा इशारा देणारे मराठा आरक्षण कृती समितीचे संस्थापक रामभाऊ गायकवाड गेल्या दोन महिन्यांपासून तुरुंगातच आहेत. यासंबंधीत गायकवाड यांच्या तुरुंगातील फोटोसह फेसबूक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.आषाढी वारीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी पंढपुरात पूजा विठ्ठलाची पूजा करण्याची…
Read More...

मराठा सेवा संघ आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार – पुरुषोत्तम खेडेकर

मराठा समाजामध्ये सरकार भांडणे लावत आहे. हे थांबले नाही तर, प्रश्न मार्गी लागणार नाही. आंदोलने थांबवा. मराठा समाजाच्या ५२ टक्के ओबीसीमध्ये समावेश करावा या मागणीचे मराठा सेवा संघ मुख्यमंत्र्यांना पंधरा दिवसामध्ये निवेदन देणार असल्याचे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितले.कुर्डुवाडी येथे मराठा सेवा संघाच्या जनसंवाद…
Read More...

मराठा आरक्षण याचिकेवर सोमवारी सुनावणी

आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाचे सुरू असलेले आंदोलन आणि त्याला लागलेले हिंसक वळण्याच्या पार्श्‍वभूमीवर गेली दोन वर्षे उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षण याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात डिसेंबर 2017 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.न्यायमूर्ती ए. ए. सय्यद आणि न्यायमूर्ती एस. सी.…
Read More...

मराठा आरक्षण : अहवाल येण्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून फायदा नाही – देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल महत्त्वपूर्ण आहे. हा अहवाल येण्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून फायदा होणार नाही. त्यामुळे आयोगाचा अहवाल येताच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार विशेष अधिवेशन घेईल, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य…
Read More...

- Advertisement -

ताई अशीच पाठीशी उभी रहा …मराठा आंदोलकांचे अनोखे ‘रक्षाबंधन’

आज सर्वत्र मोठ्या उत्साहात रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे.साधारणपणे या दिवशी बहीण भावाला राखी बांधते मात्र पुण्यात काहीसं वेगळं चित्र पहायला मिळालं. मराठा आंदोलनादरम्यान ठामपणे पाठीशी उभ्या राहिलेल्या मराठा भगिनींना राख्या बांधून मराठा आंदोलकांनी पुण्यात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. गेल्या ७ दिवसांपासून पुण्यातील विभागीय आयुक्त…
Read More...

पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर

सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले, असल्याचा आरोप मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडकर यांनी शनिवारी केला. सांगलीत ते बोलत होते. यावेळी राजेंद्रसिंह पाटील, किरण पाटील, शाहीर पाटील यांचे भाषण झाले. यावेळी डॉ. संजय पाटील, श्रीरंग पाटील आदी उपस्थित होते.नेमकं काय म्हणाले पुरुषोत्तम खेडकर ?…
Read More...

मराठा मोर्चाचा पुन्हा एल्गार, आजपासून पुण्यात बेमुदत आंदोलन

मराठा मोर्चाकडून ठिकठिकाणी करण्यात आलेल्या ठोक मोर्चा आंदोलनात अनेकांवर गुन्हे नोंदवले गेले. या आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेऊ असे आश्वासन सरकारने दिले होते. तरीही आंदोलनातील अनेक तरुण तुरुंगातच आहेत. त्याचप्रमाणे आरक्षणासाठी आत्महत्या करणार्‍यांच्या कुटुंबीयांना नोकर्‍या द्या, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज 20 ऑगस्टपासून…
Read More...

मराठा मोर्चा हिंसाचारात सहभागी असणारे एटीएसच्या कारवाईत उघड झाले – संभाजी ब्रिगेड

पुणे : मराठा आरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत, या हिंसाचारात सहभागी असणारे लोक कोण आहेत हे एटीएसने केलेल्या कारवाईत उघड झालं आहे, म्हणत संभाजी ब्रिगेडकडून संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत संभाजी ब्रिगेडकडून मराठा तरुणांवर नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे…
Read More...

- Advertisement -

तोडफोड करणारे मराठा आंदोलक नव्हते : पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद

९ ऑगस्टला मराठा क्रांती मोर्चानं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या वेळी औरंगाबादमधील वाळूज येथे औद्योगिक परिसरात तोडफोड प्रकरणाला पाच दिवस होत आहे. तोडफोड करणारे मराठा आंदोलक नव्हते असे औरंगाबादचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी म्हटलं आहे.महाराष्ट्र बंद दरम्यान मराठा आंदोलनात बाहेरील व्यक्तींनी घुसखोरी केली असल्याची तक्रार क्रांती पोलीस चौकीत…
Read More...

आरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी

आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्र भर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावर उतरले आहेत. असं असताना देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षणाला विरोध आहे. आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारही जाती आधारित आरक्षणव्यवस्था रद्द करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतंय, अशी चर्चा काही वर्षांपासून सुरू आहे. 'सब का साथ सब का विकास', हे आमचं ब्रीद असून आरक्षण जसं आज…
Read More...