InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मराठा मोर्चाचा पुन्हा एल्गार, आजपासून पुण्यात बेमुदत आंदोलन

मराठा मोर्चाकडून ठिकठिकाणी करण्यात आलेल्या ठोक मोर्चा आंदोलनात अनेकांवर गुन्हे नोंदवले गेले. या आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेऊ असे आश्वासन सरकारने दिले होते. तरीही आंदोलनातील अनेक तरुण तुरुंगातच आहेत. त्याचप्रमाणे आरक्षणासाठी आत्महत्या करणार्‍यांच्या कुटुंबीयांना नोकर्‍या द्या, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज 20 ऑगस्टपासून पुण्यात बेमुदत आंदोलन होणार आहे.

यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चा तसेच सकल मराठा समाज या संघटनांची बैठक काल पुण्यातील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात संपण झाली या बैठकीत पुण्यात बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले! शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं

Sponsored Ads

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.