मराठा आंदोलन : पाटस येथे पुणे – सोलापुर राष्ट्रीय महामार्ग अडवला

सचिन आव्हाड/ दौंड – सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील पाटस येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . यावेळी आंदोलकांनी एक मराठा लाख – मराठा , जय भवानी – जय शिवाजी , एकदाच घुसणार – भगवाच दिसणार आदि घोषणा दिल्या. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील याठिकाणी होता.

पाटस येथे रास्तारोको आंदोलनावेळी रोटी, हिंगणी गाडा, वासुदे, कुसेगाव, पाटस या गावांतील नागरिक उपस्थित होते . सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी महामार्ग अडविला . यावेळी अनेक नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले . शासन मराठा समाजाला आरक्षण देत नसल्याने शासनाचा निषेध आदोलकांच्या वतीने करण्यात आला . मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.

आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक सुरज बंडगर आणि मंडल अधिकारी प्रकाश भोंडवे यांनी स्विकारले . यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

घटनेत बदल करुन मराठा समाजाला आरक्षण द्या : शरद पवार

ब्रेकिंग : अन्यथा १ ऑगस्टला जेलभरो आंदोलन; मराठा आंदोलकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

 

महत्वाच्या बातम्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.