InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘मराठा आरक्षण जाहीर करा, अन्यथा मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही’

राज्य शासनाने मराठा समाजाला १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षण जाहीर करावे, अन्यथा मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही’ असा इशारा मराठा मार्च्याच्यावतीने देण्यात आला आहे.  १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षण जाहीर झाले नाही तर मराठा मोर्चाकडून २० नोव्हेंबरपासून आझाद मैदानात आमरण उपोषण करण्यात येईल. शासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची दिशा बदलून मोर्चे, उपोषण, गनिमी कावा किंवा हिंसक आंदोलनांचाही समावेश असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच आरक्षण जाहीर झाले नाही तर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा मराठा मार्च्याच्यावतीने देण्यात आला आहे. त्याचबरोबर आंदोलनादरम्यान आंदोलकांवर जे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत ते  मागे घेण्यात यावे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शब्दाचे पालन करावे अन्यथा सरकारची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, असे यावेळी समन्वयकांकडून सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply