InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मराठा आरक्षण : आज पासून जेल भरो आंदोलनाला सुरुवात

आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्र बंद’ नंतर आता ‘जेल भरो’ आंदोलनाला सुरुवात झाली आहे. नाशिक मध्ये याची सुरुवात झाली आहे आणि यामुळे नाशिक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल आहे. आंदोलकांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनादरम्यान सरकार विरोधी घोषणा दिल्या जात आहेत.

मूक मोर्चे, ठोक मोर्चे आणि बंद पुकारूनही सरकार मराठा समाजाला आरक्षणाचं ठोस आश्वासन देत नसल्याने मराठा तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे या आंदोलकांनी आजपासून जेलभरो आंदोलन सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर, पुणे, नवी मुंबई, औरंगाबाद, लातूर, नाशिकमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नाशिकच्या मालेगाव येथील शिवाजी पुतळ्याजवळ आज सकाळी शेकडो आंदोलकांनी एकत्र जमून जोरजोरात घोषणाबाजी केली. त्यानंतर या आंदोलकांनी स्वत:ला पोलिसांच्या हवाली करत अटक करवून घेतली.

‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले! शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं

Sponsored Ads

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.