मराठा आरक्षण : महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, तिन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांची हजेरी

मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेऊन 102 व्या घटना दुरूस्तीचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यामुळे एखाद्या जातीला मागास ठरवून तिला आरक्षण देण्याचा राज्यांचा अधिकार केंद्र सरकारने मान्य केला आहे. याबाबत संसदेत विधेयक मंजूर केलं जाईल.

मात्र, इंद्रा सहानी खटल्यातील निर्णयानुसार 50 टक्कांच्यावर आरक्षण देता येणार नसल्याने राज्य सरकार कोंडीत सापडल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने घातलेली 50 टक्क्यांची मर्यादा शिथील करण्यात यावी अशी मागणी राज्यांनी केली आहे. तर महाराष्ट्रात देखील ही मर्यादा काढून टाकावी किंवा मर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी केली आहे.

याच मुद्द्यावर काल महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचे मोठे नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलवली होती. यामध्ये राज्यसभेचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते पी चिदंबरम, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अभिषेक मनु सिंधवी, खासदार संजय राऊत आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत आरक्षणची मर्यादा शिथील करण्यात यावी, यावर सर्वांचं एकमत झालं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा