InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मराठा आरक्षण : आज खा अनिल शिरोळे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चा कडून ठिय्या आंदोलन

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अवघा महाराष्ट्र पेटून उठला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पुढील मोर्च्यासाठी रस्त्यावर आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्व भूमीवरून आज खासदार अनिल शिरोळे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चा कडून ठिय्या आंदोलन सुरु आहे. तसेच राज्यात जो हिंसाचार झाला त्याचा क्रांती मोच्याशी संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सरकारकडून ७ ऑगस्टपर्यंत समाजाच्या सर्व मागण्यांवर विचार व्हावा अन्यथा राज्यभर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी सकल मराठा मोर्चाकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे. यापुढे मागण्यांसाठी राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. जोवर मागण्या मान्य होत नाहीत तोवर मोर्चा सुरूच राहिल असे आंदोलकांनी स्पष्ट केले. तसेच आरक्षाबाबत चंद्रकांत दादा पाटील यांची उप- समिती तात्काळ बरखास्त करावी अशी मागणी करण्यात आली.

राज्य शासनाच्यावतीने लेखी आश्वासन येत नाही तोपर्यंत परळीतील आंदोलन स्थगित होणार नाही. मात्र, राज्यात आंदोलकांव्यतिरिक्त बाहेरच्या लोकांकडून घडवून आणलेला हिंसाचार लक्षात घेता, आंदोलकांनी कुठल्याही स्वरुपात खासगी, सरकारी वाहनांचे नुकसान करु नये. इथून पुढची सर्व आंदोलने ठिय्या स्वरुपातच करावीत असे आवाहनही यावेळी सकल मराठा मोर्चाकडून करण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनामुळे जी हिंसा झाली, त्याबद्दल बैठकीत चिंता व्यक्त केली जात असून आंदोलनात असामाजिक तत्त्व घुसल्यामुळे हिंसाचार घडला असे आंदोलकांनी स्पष्ट केले. मोर्च्याचा उद्देश सपूर्ण राज्यात फक्त ठिय्या आंदोलन करणं हाच होता असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले! शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं

Sponsored Ads

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.