InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मराठा आरक्षण :भरपावसात पृथ्वीराज चव्हाणांचा मांडी घालून रास्ता रोको

- Advertisement -

कोल्हापूर – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलकांच्या आत्महत्येचे सत्र अद्यापही सुरूच आहे. कोल्हापूरच्या कणेरीवाडीतील विनायक परशुराम गुदगे या सकल मराठा कार्यकत्यानेही आपले जीवन संपवले. विनायकच्या आत्महत्येनंतर येथील दसरा चौकात संतप्त कार्यकत्यांनी रास्ता रोको केला आहे. या रास्ता रोको आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही रस्त्यावर मांडी घालून सहभाग नोंदवला.

दरम्यान, धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांना मराठा आंदोलनकांच्या रोषाचा सामना करावा लागला. धुळ्यातील नियोजन मंडळाच्या बैठकीत भुसे यांच्या विरोधात धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच खासदार हिना गावित यांची गाडीही आंदोलकांनी फोडल्याचे समोर आले आहे. गाडीच्या काचा फोडून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. खासदार हिना गाडीत असतानाच ही तोडफोड करण्यात आली. आंदोलकांनी गाडीवर चढत गाडीची तोडफोड केली. खासदार गावित यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून गाडीवर हल्ला करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मराठा आरक्षणाची सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला

- Advertisement -

कुर्डूवाडीत मराठा आरक्षणासाठी वाघ्या मुरळीचा गोंधळ

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.