मराठी कलाकारांचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

पश्चिम महाराष्ट्राला गेल्या पाच दिवसांपासून पुराच्या पाण्यानं वेढा घातला असून महापुरामुळं राज्यात २८ जणांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक मराठी कलाकारांनी पुढे येऊन मदतीचा हात दिलाय. अभिनेता सुबोध भावेनंही ट्विट करत आम्ही ‘कोल्हापूर, सांगलीकरांच्या सोबत आहोत,’ असं म्हणत त्यांना धीर दिला आहे

उमेश कामत, सई ताम्हणकर, सुबोध भावे,  सुयश टिळक, प्रवीण तरडे यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी कोल्हापूरकरांना मदतीचा हात दिला आहे. ‘ज्या कोल्हापूरकर, सांगलीकर रसिकांनी आम्हाला इतकी वर्ष सांभाळलं, प्रेम केलं ते संकटात असताना आम्हीही मागू राहू शकत नाही. मराठी नाट्य, चित्रपट, दूरचित्रवाणीवरील सर्व कलाकार नेहमी तुमच्या मदतीला असतील.’ असं ट्विट कलाकारांनी केलं आहे. तसंच, सामान्य नागरिकांनाही मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.