InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘कुणाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न नाही’; मराठी कलाकारांचे स्पष्टीकरण

- Advertisement -

राज्यात सत्तास्थापनेबाबत अजूनही चित्र स्पष्ट झालेले नाही. महाशिवआघाडीचा प्रयोग राज्यात होऊ घातलाय. परंतू, सरकार स्थापना कधी होणार याबाबत अजुनही चित्र स्पष्ट नाही. राज्यात पुन्हा निवडणूका होऊ शकतील अशीही एक शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी ‘पुन्हा निवडणूका’ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड केल्याने एकच खळबळ उडाली होती. याबाबच मराठी कलाकारांकडून आता स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आमची कुणाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न नाही, याबाबत लवकरच भूमिका मांडू, असे स्पष्टीकरण कलाकारांनी दिले आहे.  मराठी अभिनेते अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर यांच्यासह अनेकांनी सकाळी 10.30 ते 11 च्या दरम्यान #पुन्हानिवडणूक हा एकच हॅशटॅग वापरुन ट्विट केलं होतं. त्यामुळे काँग्रेसने यावर संशय व्यक्त केला होता.

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.