मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान, ‘पगल्या’ला तुर्की-ओन्कोमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार!

मुंबई : ‘पगल्या’ या मराठी चित्रपटाने ‘ग्लॅडिएटर फिल्म फेस्टिव्हल’ तुर्की येथे दिग्दर्शक विनोद पीटर यांनी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आणि ओन्को एस्टोनिया इथे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे.

या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा मराठी चित्रपटाच्या शिरोपेचात मानाचा तुरा रोवला गेले आहे. इतकेच नाही तर आत्तापर्यंत जगभरातल्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये 47 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोद सॅम पीटर यांनी केले आहे.

या चित्रपटाबाबत निर्माते-दिग्दर्शक विनोद सॅम पीटर म्हणतात की, “एक निर्माता म्हणून माझ्या पहिल्याच चित्रपटाला जागतिक व्यासपीठावर ओळख मिळतेय ते पाहून मी खूप खूष आहे. अधिकृत निवडीबद्दलच नाही तर अनेक महोत्सवात या चित्रपटाला मिळालेले पुरस्कार गौरवास्पद आहेत. मला आनंद होत आहे की, एका मराठी चित्रपटाला विविध देशांमध्ये आपली ओळख मिळत आहे. असे बरेच काही फिल्म फेस्टीव्हल झाले आहेत ज्यांत निवडलेल्या किंवा पुरस्कार मिळालेल्या यादिंमध्ये ’पगल्या’ हा पहिला चित्रपट आहे. भारताचा झेंडा जगभरात झळकल्याचा आपल्याला अभिमानच वाटतो.”

‘पगल्या’ या मराठी चित्रपटाला मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021 चा बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड मिळाला आहे. तसेच इटली, अमेरिका, युके आणि स्वीडन या देशातील चित्रपट महोत्सवात देखील या चित्रपटाची निवड झाली आहे. या सिनेमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर दाद मिळत आहे

या सिनेमाला कॅलिफोर्नियातील लॉस वर्ल्ड प्रीमियरमध्येही गौरवण्यात आलं आहे. याशिवाय लंडन, इटली, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स, तुर्की, इराण, अर्जेंटिना, लेबनन, बेलारुस, रशिया, कझाकिस्तान, इज्रायल, अमेरिका आणि कॅनडामध्ये विविध फिल्म फेस्टिव्हल्समध्ये सन्मान मिळवले आहेत. तसेच कॅलिफोर्निया येथे झालेल्या वर्ल्ड प्रीमिअर फिल्म अवॉर्ड या पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक विनोद पीटर यांच्या ‘पगल्या’ या चित्रपटाने बाजी मारली आहे.

लहान मुलांच्या भावविश्वात पाळीव प्राण्यांचे असणारे स्थान आणि प्राण्यांबद्दल असणाऱ्या त्यांच्या निरागस भावना या चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात ऋषभ आणि दत्ता या दोन मुलांची ही कहाणी असून, जी मुलं दहा वर्षाच्या आसपास वयोगटातील आहेत, त्यांच्याभोवती सिनेमाचं कथानक फिरतं. एक शहरातील तर एक खेड्यातील असे हे मित्र. एका मित्राचं हरवलेलं कुत्र्याचं पिल्लू दुसऱ्याला सापडतं आणि ते कसे मित्र बनत गेले, ही साधी, सरळ पण प्रत्येकाला आपली वाटणारी ही कहाणी आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.