‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’चा मराठी ट्रेलर रिलीज

ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी द अनसंग वॉरिअर या सिनेमाचा मराठी ट्रेलर रिलीज झाला आहे.  अभिनेता अजय देवगणचा हा बहुचर्चित सिनेमा आहे. अजय देवगण तानाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. सावित्री मालुसरेंच्या भूमिकेत अभिनेत्री  काजोल आणि उदयभानच्या भूमिकेत सैफअलीखान  आहे.  तानाजी मालुसरेंची ही शौर्यगाथा 3डी मध्ये बघायला मिळणार आहे.

या चित्रपटात शरद केळकर (छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत), देवदत्त नागे ( सूर्याजी मालुसरे), शशांक शेंडे (शेलारमामा) या मराठी कलाकारांच्या भूमिका आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.